काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल

0
296

मुंबई, दि. १० (पीसीबी) : ” कॉग्रेस गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये हारली. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा परफाॅर्मन्स देखील अपेक्षा पेक्षा खराब होता. लोकांनी विकल्प शोधण्याचा पर्याय निवडला. त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापेक्षा आम्ही कमी पडलो, हे खरं आहे. कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

”लोकशाहीत ज्याचा विजय होतो त्याचं अभिनंदन करायची परंपरा आहे. मी भाजपचं अभिनंदन करतो. भाजपचा हा मोठा विजय आहे. पंजाबमध्ये आपचा ऐतिहासिक विजय झाला आहे,” असे राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, ”आम्ही लढलो, ही लढाई चालू राहिल. विजय पराजय अंतिम नसतो, शिवसेनेच्या बाबतीत ही सुरुवात आहे, भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू. भाजपनं विजय पचवायला शिकले पाहिजे, सुडानं काम न करता चांगलं काम करावं, अशी अपेक्षा मी करतो, उत्तर प्रदेशात जर चांगल्या प्रकारे विरोधकांना एकत्र आणता आलं नाही. भविष्यात विरोधी पक्ष काम करताना नियोजनपूर्वक विचार करु, काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल,”
” उत्तर प्रदेशात मोठा असंतोष होता, मात्र फायदा घेता आला नाही,” असे राऊत म्हणाले. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. यासह मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजप सरकार स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.

कॉंग्रेस उमेदवारांना हॉटेलमध्ये हलविले ; पी चिदंबरमांचा पहारा
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याठिकाणी जाऊन प्रचार केला होता. पण शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये खातंही खोलता आलेलं नाही. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवारांना 0.02 टक्के म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं पडली आहेत.