अकेला देवेंद्र क्या करेगा’ असे म्हणत डिवचलं. पण फडणवीसांना करुन दाखवलं

0
272

पुणे , दि. १० (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ असे म्हणत डिवचलं. पण फडणवीसांना करुन दाखवलं. अशी चर्चा सध्या गोव्याच्या निवडणूक निकालावरुन सुरु झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या फडणवीसांनी गोवा काबीज केले. ”अकेला देवेंद्र क्या करेगा,” असे म्हणणाऱ्यांना फडणवीसांनी चांगलीच चपराक लगावली आहे. #अकेला देवेंद्र क्या करेगा, हा ट्रेंड सध्या जोरात सुरु आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना फडणवीसांनी टप्यात आणून कार्यक्रम केला असेही काही जण म्हणतात, तर संपूर्ण महाविकास आघाडीला फडणवीस पुरुन उरले. १०६ आमदार घरी बसवले, ”अकेला देवेंद्र क्या करेगा” अशी टीका करीत फडणवीसांना डिवचण्यात आले. पण याच फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या एक-एका मंत्र्यांनी विकेट काढली, महाविकास आघाडीच्या बारा मंत्र्यांची सध्या चैाकशी सुरु आहे. फडणवीस टप्यात आल्यावर कार्यक्रम करीत नाही, तर टप्यात आणण्याची परिस्थिती निर्माण करतात, मग करेट कार्यक्रम करतात, असे म्हटलं जाते.

दोन दिवसापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी आघाडी सरकारवर ‘पेन ड्राईव्ह’ बॅाम्ब टाकला. फडणवीस थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

”अकेला देवेंद्र क्या करेगा” याचं उत्तर आज अवघ्या महाराष्ट्रासोबत देशाला मिळालं ! गंभीर विषयाला कसं हाताळायचं त्याचे पुरावे कसे सादर करायचे? व्यवस्थित विषयाची मांडणी कशी करायची, आणि हे सर्व करत असताना विरोधकांची बोलतीही बंद करायची याची कला फडणवीस खूप चांगल्या रीतीने येते.

त्यामुळे त्याचाशी मुकाबला करण्यासाठी विरोधकांना पूर्ण तयारी करुन आखाड्यात उतरावे लागते. सत्तेत नसताही फडणवीसांची धास्ती महाविकास आघाडीला नसते. दिवाळीच ‘बॅाम्ब फोडणार’ असे सांगत फडणवीसांनी मलिकांना ईडीच्या कोठडीत पाठविले. ‘एक फडणवीस सर्व कासावीस’ अशी अवस्था सध्या विरोधकांची झाली आहे का, असा प्रश्न देखील सध्या विचारण्यात येतो.