काँग्रेसला मला संपवायचे आहे – पंतप्रधान मोदी

0
478

प्रतापगड, दि. ४ (पीसीबी) –  काँग्रेसला मला संपवायचे आहे, त्यासाठी मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे.  त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करत आहे,  असा घणाघाती  आरोप पंतप्रधान  मोदी यांनी आज (शनिवार) येथे केला.

प्रतापगडमध्ये प्रचार सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी म्हणाले की, काँग्रेसला मला संपवायचे आहे. पण माझी ५० वर्षांची तपस्या  सहजासहजी संपवणे शक्य होणार नाही. मी ५० वर्षं अविरतपणे काम केले आहे.  न थकता ,न थांबता देशासाठी झटलो आहे. तेव्हा मी स्वत:ही पडणार नाही आणि पक्षालाही पडू देणार नाही, असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर मत चोरणारा पक्ष असण्याचा आरोप केला.  तसेच कॅबिनेटचे अध्यादेश फाडणारा पक्ष लोकशाहीला जागेल का?  असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून काँग्रेसवर निशाणा साधला.