काँग्रेसच्या ‘भारत बंद’ला मनसे पाठिंबा – राज ठाकरे  

0
870

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – गगनाला भिडलेल्या  इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी (दि.१०) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.  मनसे या बंदमध्ये पूर्णपणे सहभागी होणार आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन  बंदला पाठिंबा देतील. मात्र, कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे मनसे म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून या प्रकाराचे आदेश दिले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘भारत बंद’ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई,  ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमधील मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ ठेवण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.