कल्याण जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, दहा जणांविरोधात गुन्हा

0
223

दापोडी, दि.२६ (पीसीबी) : दापोडीतील कल्याण जुगार, मटका अड्डयावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.25) छापा टाकून यामध्ये अवैधरित्या मटका खेळणा-या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 57 हजार 465 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सागर राजू गायकवाड (वय 25, रा. दापोडी), निलेश मोहन गुहागरकर (वय 35, सांगवी), मनोज ज्ञानेश्वर अडसुळे (वय 52, रा दोपोडी), विजय शिवाजी वायदंडे (वय 65, रा. पिंपळे गुरव), रफिक मकबुल शेख (वय 61, रा. दापोडी),इब्राहिम उस्मान अत्तार (वय 38, रा. फुगेवाडी), सिद्धार्थ दिगंबर कांबळे (वय 41, रा. दापोडी), नितीन मधुकर देवकाते (वय 37, रा. विश्रांतवाडी), अल्ताफ मिंतु शेख (वय 30, रा. दापोडी), मनिष अशा एकूण दहा जणांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील स्मशानभुमीकडे जाणा-या रोडलगत अवैधरित्या सुरू असलेल्या कल्याण जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.