कलम ३७० वेगळी बाब होती… ३७१ ला आम्ही हातही लावणार नाही – अमित शहा

0
634

गुहावटी, दि. ८ (पीसीबी) – कलम ३७० ही वेगळी बाब होती परंतू ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या ३७१ व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. आम्ही कलम ३७१ ला हात लावणार नाही, असे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.

नुकतीच आसाममध्ये एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आसामचा दौऱ्यावर होते. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे अमित शहा म्हणाले.

कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ सुद्धा हटणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र कलम ३७१ आम्ही हटवणार नसल्याचं शहा म्हणाले आहेत. दरम्यान,२६ जानेवारी १९५० रोजी ईशान्येकडील राज्यांमध्ये कलम ३७१ लागू करण्यात आले. ईशान्येकडील ६ राज्यांसह देशातील ११ राज्यांमध्ये हे कलम लागू आहे.