एमआयएम आणि वंचितची युती ओवेसींसोबत महाराष्ट्रातल्या नेत्यांशी नाही; आंबेडकरांनी खासदार जलिल यांना ठणकावले

0
494

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – एमआयएमसोबतची आमची युती महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झालेली नाही तर  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींसोबत झालेली आहे. ओवैसी जोपर्यंत याविषयी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची आघाडी कायम राहणार, असे वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यापासून सुरूवात झाली. ज्यावर आपण काही जास्त बोलू शकत नाही, पण औवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचे आपणास सांगितले आहे. मात्र चर्चेतून अजूनही काही मार्ग निघत असेल तर आमची तयारी आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी म्हटले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील आघाडी तुटल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.  त्यांची माणस हैद्राबादवरून आमच्याकडे आली. त्यानंतर ते आता ओवेसीकडे निरोप घेऊन गेल्याचेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, वंचित एमआयएम युतीवरून बरेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. युतीबाबत काय होते पाहणे महत्वाचे आहे.