कर्नाटकात कुमारस्वामींना धक्का; दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला 

0
720

बेंगळुरू, दि. १५ (पीसीबी) – कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारचा दोन अपक्ष आमदारांनी आज (मंगळवार) पाठींबा काढून घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे.   दोन दिवसांपासून सरकार अस्थिर करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याची सुरूवात आजपासून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. त्यांनी राज्यपालांकडे लिखीत स्वरुपात आपला राजीनामा दिला आहे. कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या युती सरकारमधून आम्ही ताबडतोब बाहेर पडत आहोत. त्यामुळे आपण आमच्या राजीनाम्यावर तत्काळ कार्यवाही करावी, असे या दोन्ही आमदारांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.

दरम्यान, आमदार आर. शंकर यांनी म्हटले की, आज मकरसंक्रांती आहे. या दिनानिमित्त आम्हाला सरकार बदलायचे आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे त्यामुळे आज आम्ही कर्नाटक सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत, असे सांगितले.