नंदुरबारमधील नर्मदा नदीत बोट बुडाली; २५ जण गंभीर

0
482

नंदुरबार, दि. १५ (पीसीबी) – धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंटजवळ आज (मंगळवारी) नर्मदा नदीत भाविकांची बोट बुडाली. बोटमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी २५ जण गंभीर असल्याचे समजते. त्यांना धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.