कर्नाटकातील जेडीएस, काँग्रेसचे १४ बंडखोर आमदार अपात्र घोषित

0
496

बेंगळुरू, दि. २८ (पीसीबी) – कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार  कोसळल्यानंतर आज (रविवार) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे.

आधी विधानसभा अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १७ आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केले होते. यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत सिध्द करता आले नाही.  मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सोमवारी (दि.२९) बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांचा आजचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, १४ आमदारांना अपात्र केल्याने विधानसभेत आमदारांची संख्या २०७ वर आली आहे. त्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदारांची  गरज आहे.  भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आहेत.  यामुळे येडियुरप्पांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.