धक्कादायक: भोसरीत ३ मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या

0
597

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन निर्दयी आईने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळच्या  सुमारास भोसरी परिसरातून उघडकीस आली.

जिआन बागवान (वय ६), झोभा बागवान (वय ७), अलफिया बागवान (वय ९) असे खून झालेल्या तीन मुलांची नावे असून फातिमा अक्रम बागवान (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या आईचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास फातिमा बागवान यांनी मुलगा जिआन मुली झोभा आणि अलफिया या तिघांना गळफास देऊन खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. फातिमाने एवढेमोठे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र पती अक्रम काहीच कामधंदा करत नसल्याने तिने हे पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.