कर्णधार अजिंक्यचा ऑस्ट्रेलियावर दुसरा विजय

0
168

मेलबर्न, दि.२९ (पीसीबी) : मधल्या फळीतला आणि मुंबईचे क्रिकेट अंगात भिनलेला अजिंक्य रहाणे आतापर्यंत भारतीय संघाचा नियमित कर्णधार राहिला नसला, तरी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातवेळा बदली कर्णधार म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे त्याने नेतृत्व केलेल्या तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळविला आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली एकमात्र पराभव टी २० सामन्यात झाला आहे. कर्णधार म्हणून रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विजय २०१७ मध्ये धरमशाला येथील कसोटीत मिळविला. त्यानंतर २०१८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळविला.

कारकिर्दीमध्ये कर्णधारपदाच्या आपल्या पहिल्या तीन सामन्यात विजय मिळविणारा अजिंक्य रहाणे दुसरा भारतीय कर्णधार. यापूर्वी अशी कामगिरी महेंद्रसिंह धोनीची. रहाणेच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली होती. त्या विजयात आणि या विजयात योगायोगाने काही गोष्टी जुळून आल्या आहेत. काय आहेत त्या गोष्टी पाहुयात….

भारताने नाणेफेक तेव्हाही हरली होती
त्या सामन्यातही भारत पाच गोलंदाजांसह खेळला
त्या वेळी देखील पाचवा गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा
त्या कसोटीतही पहिल्या डावात आघाडी
जडेजाची त्या कसोटीतही अष्टपैलू कामगिरी ६३ धावा आणि ४ बळी- भारताने तो सामनाही आठ गडी राखून जिंकला होता
भारताच्या विजयात तेव्हाही रहाणे नाबाद होता