कदाचित म्हणूनच पत्रकारांना ‘कोरोनायोद्धा’ म्हणतात…कोणाकडूनही आपल्या सुरक्षेची आणि मदतीची अपेक्षा न ठेवता केलं ‘हे’ का… एकदा वाचाच

0
219

सातारा, दि.२३(पीसीबी) : कोरोनाचा संसर्ग थांबायचं काही नाव घेईना. काही दिवसांपूर्वीच एका पत्रकाराला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. आता समोर आलेल्या माहितीनुसार, पत्रकारांसाठी पहिलं कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन) हे साताऱ्यात सुरु करण्यात आलंय. साताऱ्यातील यवतेश्वर इथल्या हॉटेल ‘निवांत’मध्ये पत्रकारांनीच हे सेंटर सुरु केलं आहे. यावरून आता स्पष्ट होतंय कि, कोणाकडूनही आपल्या सुरक्षेची आणि मदतीची अपेक्षा न करता पत्रकारांनीच पत्रकारांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.

कारण सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोना संसर्ग खूप वाढला आहे. या आयसोलेशन सेंटरमध्ये दोन ऑक्सिजनमशीनची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य विभागाकडून एक डॉक्टर आणि दोन नर्स या सेंटरमध्ये नेहमी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पत्रकार संघाने प्रशासनाच्या सूचनांनुसार नियमावली तयार केलीये त्यात नमूद केल्याप्रमाणे सातार्‍यातील ज्या पत्रकारांच्या घरी होम आयसोलेशनची सोय नाही, फक्त अशाच कोरोनाबाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था आहे.