कंपनीच्या फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

0
205

बाणेर, दि. ९ (पीसीबी) – एका कंपनीत काम करत असताना त्या कंपनीचे क्रेडिट कार्ड आणि इतर साहित्य वापरून दुसरी कंपनी स्थापन करून पहिल्या कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 20 जून 2019 ते 12 फेब्रुवारी 2020 या डॉकप्लेक्सेस ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बाणेर येथे घडला.

फनीश चंद्रा (रा. पिंपळे सौदागर), निखिल प्रसाद (रा. सुस रोड पुणे), अतील पारीख (रा. पिंपळे सौदागर), विनायक साठे (रा. बाणेर), निकेश धुंडे (रा. ठाणे वेस्ट), राधिका भावे (रा. पौड रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कुशलेश अभिमन्यू सिंग (वय 32, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉकप्लेक्सेस ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एचआर असोसिएट मॅनेजर पदावर काम करतात. आरोपी देखील फिर्यादी यांच्या कंपनीत काम करत होते. फिर्यादी यांच्या कंपनीत काम करत असताना आरोपींनी फनीश चंद्रा याच्या सोबत मिळून एमडी कनेक्ट ही कंपनी स्थापन केली. त्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरले. तसेच फिर्यादी यांच्या कंपनीने पुरवलेल्या लॅपटॉपचा वापर करून तसेच कंपनीची गोपनीय माहिती डाऊनलोड करून तिचा एमडी कनेक्ट या कंपनीसाठी वापर केला. फिर्यादी यांच्या कंपनीने पुरविलेले लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर साहित्य कंपनीला परत न करता कंपनीच्या लॅपटॉप मधून कोणतीही माहिती मिळू नये, यासाठी डॅमेज करून कंपनीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.