औरंगाबाद शिवसेनेच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

0
239

औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सतत नागरिकांच्या संपर्कात असलेल्या लोकप्रतिनिधींना आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे. चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे निधन झाले, तर आता औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात महापौर मुरली मोहळ यांच्यासह आमदार मुक्ता टिळक, दोन माजी आमदार, सहा नगरसेवक कोरोना बाधित झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही आमदार महेश लांडगे यांच्यासह सहा नगरसेवकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील तीन मंत्री, सात आमदार, अनेक महापालिका, जिल्हापरिषदा, नगरपरिषदांमधील लोकप्रतिनिधींनाही वाईट अनुभव आहे. लोकप्रतिनिधींनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

राज्यातील पाच हजारावर पोलिस कोरोना बाधित आहेत, तर ७० पोलिसांचा हकनाक बळी गेला आहे. बाधित डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय यांची संख्या मोठी आहे.