भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोना

0
235

लातूर, दि. ८ (पीसीबी) : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. अभिमन्यू पवार आणि त्यांचे पुत्र परिक्षीत या दोघांनाही संसर्ग झाला आहे.

“मला हलकासा ताप आणि खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली होती. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत” अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

“लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही.” असे त्यांनी सांगितले.
“मागच्या चार-पाच दिवसात माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घ्यावे. तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करुन घ्यावी. काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची‌ काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रुजू होईन” असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.