एक्स्प्रेसवर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

0
116

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशातच गुजरातमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेस वे वर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेस वेवर नडियादजवळ ही घटना घडली आहे. भरधाव कार एका ट्रेलरवर आदळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार अहमदाबादवरून वडोदराला जात होती. नडियादजवळ आल्यानंतर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट ट्रेलरवर जाऊन आदळली. हा अपघातात इतका भीषण होता की, यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर 108 ची रुग्णवाहिका पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे.

एक्स्प्रेस हायवेवर बचावकार्य करण्यासाठी टीम पोहोचली

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती सुझुकी एर्टिगा कारमधून ही लोक वडोदराला जात होती. कारचा वेग खूप जास्त होता. त्याच वेळी समोर असलेल्या ट्रेलरवर कार पाठीमागून जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. निमी कार ट्रेलरच्या खाली चालल्या गेल्या होती. त्यामुळे घटनास्थळी जागेवरच 8 जणांचा मृत्यू झाला.

मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू 

प्राथमिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही कार अहमदाबाद पासिंगची अर्टिगा कार नंबर GJ 27 EC 2578 आहे. सध्या कारमध्ये प्रवास करणाऱ्या मृतांची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.ज्या ट्रेलरला ही कार धडकली तो महाराष्ट्र पासिंगचा होता. पुण्याहून जम्मूला जात होता. वडोदरा एक्सप्रेस-वे आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रेलर हा हायवेवर डाव्याबाजूला उभा होता. या अपघात एका 5 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांआधीच इथंच झाला होता अपघात

धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस-वे वर नडियाद जवळ एक भीषण अपघात झाला होता. एक खासगी बस उलटली होती. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वेळीच स्थानिक लोकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.