“एके काळी दगड खायचो, आता विरोधकांचं डिपाॅझिट जप्त करतो”

0
341

नागपूर,दि.१(पीसीबी) – आम्ही एके काळी दगड खायचो, आता विरोधकांचं डिपाॅझिट जप्त करतो असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

नितीन गडकरी म्हणाले, एक काळ असा होता जेव्हा भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांना दगड खावे लागत असत, पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज दिवस बदलले आहेत. आज आमचे उमेदवार विरोधकांचे डिपाॅझिट जप्त करत असतात, असं वक्तव्य केलं आहे.

पक्षात असलेल्या नव्या कार्यकर्त्यांना जुना इतिहास माहित नसतो. त्यामुळे तो काळ त्यांच्या विस्मरणातून जातो. जनसंघाच्या काळापासून अतिशय कठीण परिस्थितीत पक्ष संघटना वाढली आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कार्यकर्तांच्या मेहनतीमुळे आपण आज अच्छे दिन पाहत आहोत. मात्र, नेहमीच असा काळ नव्हता, असंही गडकरी म्हणाले आहेत.