“सव्वा लाख कोटींच्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा?”

0
583

मुंबई,दि.१(पीसीबी) – सव्वा लाख कोटींच्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा? असा सवाल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

महाराष्ट्राची इच्छा नसताना सव्वा लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राला त्याचा काय फायदा आहे? आपण याबाबत पुर्नविचार करतो आहोत. बुलेट ट्रेनचं काम पुढं गेलं तर हा खर्च दीड लाख कोटींपर्यंत होईल, असं सांगितलं जात आहे. हा खर्च महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला.

अजित पवार म्हणाले, बीकेसीच्या भुखंडावर स्थानक करायचं आहे, म्हणून जागा द्यावी लागत आहे. हे मुंबई महानगरचं नुकसान आहे, त्यामुळं ते आपल्याला परवडणारं नाही. आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर जसं आपल्या विचाराचं सरकार आलं आहे, तशी आपली महानगरपालिका आली पाहिजे.

दरम्यान, महापालिकेत महाविकासआघाडीचे नगरसेवक निवडूण आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात केलं.