एकाच दिवशी चित्रपटांचा १२० कोटींचा गल्ला; मग कुठे आहे आर्थिक मंदी? – भाजप मंत्री

0
440

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  २ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली? असा सवाल करून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आर्थिक मंदीवर भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या  प्रचारासाठी मुंबईत रवीशंकर प्रसाद आले होते. यावेळी ते  एका वृत्तसंस्थेशी  बोलत होते. तीन चित्रपटांच्या कमाईचा आधार घेत यातून मात्र त्यांनी अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे सांगितले.

रविशंकर म्हणाले की, करदात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.  जागतिक मंदीच्या काळातही देशाची आर्थिक वाटचाल  ६ टक्क्यांहून अधिक इतक्या गतीने होत  आहे. काहीजण बेरोजगारीच्या मुद्द्याचा वापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत.  पण आम्ही सर्वांना सरकारी नोकऱ्या देऊ , असे कधीच म्हटले नव्हते, असे त्यांनी सांगितले.