एकनाथ खडसे ३ महिन्यांपासून संपर्कात; शरद पवारांचा गौप्यस्फोट

0
454

ठाणे, दि. ३ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ३ महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,  असा  गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरूवार) येथे केला . ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  एकनाथ खडसे काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो, त्यामुळे आताच ते राष्ट्रवादीत येतील असे वाटत नाही, असेही  शरद पवार  यांनी सांगितले.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  बीडचा दौरा  रद्द करून आज एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे  मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपच्या दोन यादी जाहीर झाल्या आहेत. पण खडसे यांना  उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे.  त्यामुळे अजित पवार यांनी जळगावला  खडसे यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे.