कोणत्याच पवाराच्या संपर्कात नाही; एकनाथ खडसेंचा खुलासा

0
444

जळगांव, दि. ३ (पीसीबी) – तीन महिन्यात काय, तर गेल्या तीन वर्षात कोणत्याच पवारांशी आपला संबध नाही, असा खुलासा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. कोणत्याच पवारांशी आपला संपर्क नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे खडसे यांनी म्हटले आहे.

खडसे ३ महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,  असा  गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरूवार) ठाण्यात केला. यावर खडसे यांनी खुलासा करताना पवारांचा गौप्यस्फोट खोडून काढला. आपण कोणत्याच पवारांच्या संपर्कात नव्हतो, असे खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपच्या दोन यादी जाहीर झाल्या आहेत. पण खडसे यांना  उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बीड दौरा रद्द करून जळगावला  खडसे यांची भेट घेण्यासाठी आज गेले होते. त्यामुळे पवारांच्या विधानाला दुजोरा मिळत होता.