एआय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयात एफ डी पी चे आयोजन

0
659

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्यावतीने नुकतेच एक दिवसीय अधिव्याख्याता विकास अभियान (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) आयोजन करण्यात आले होते. बांधकाम उद्योगा व्यवसायातील नवीन संशोधन, व्यवसायातील संधी, या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने दिसत असणारे नवे बदल यावर व्यापक चर्चा झाली. या क्षेत्रातील परस्परांशी संबंधित असलेल्या सर्व व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणणे आणि यातून व्यवहारिक उपयोगिता सुलभ करणे आणि त्याचा विस्तार करणे हा उद्देशदेखील या एफडीपी ने साध्य झाला.

या कार्यक्रमाला देश विदेशातील अभियांत्रिकी शिक्षक, विद्यार्थी ,बांधकाम व्यवसायातील उद्योजक, अभियंते आणि संशोधक यांचा सहभाग मोठा होता. या कार्यक्रमाला अमेरिका ,इंग्लंड ,कॅनडा, संयुक्त अरब अमीरात तसेच ऑस्ट्रेलिया मधून नामवंत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मिस्टर जोश किस्टनर, कंट्रोल्स मॅनेजर सुपिरियर कन्स्ट्रक्शन इंडियाना अमेरिका,श्री तेजस बोरसे प्रोजेक्ट कंट्रोल इंजिनियर सुपिरियर कंस्ट्रक्शन इंडियाना अमेरिका, तसेच श्री हेमंत जैन रिजनल हेड टेक्निकल सर्विस अल्ट्राटेक सीमेंट लिमिटेड पुणेयांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी ‘ या व्यवसायातील संधी आणि आव्हाने याची चर्चा करताना नव्या तंत्रज्ञानाचा मुलभूत पायाभूत सुविधा वाढवण्यात आपल्या ज्ञानाचा कसा यथायोग्य वापर करता येईल यावर भाष्य केले. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी जगभरातून स्थापत्य अभियंत्यांना मोठ्या संधी आहेत त्याचा उद्याच्या अभियंत्यानी लाभ घ्यावा असे सांगितले. भविष्यकाळातील काँक्रीट उद्योगाची दिशा देखील स्पष्ट केली तसेच काँक्रीट उद्योगांमध्ये क्राफ्टमनशिप चे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या वतीने प्रा पी आर सातारकर प्रा मरलीन डीक्रूज प्रा शिल्पी भूनियान तर उद्योग समूहाच्या वतीने अल्ट्राटेक सिमेंट चे हर्ष शहा यांनी केले होते. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा व्ही आर पाटील यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिल्पी भूनियान यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस बोरमने, विभाग प्रमुख डॉ यु आर आवारीयांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव श्री मालोजीराजे छत्रपती यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले तसेच या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले.