उत्तर प्रदेशात एनडीएला मोठा धक्का; सपा-बसपा आघाडीची मुसंडी   

0
433

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – ‘एबीपी न्यूज’-‘नेल्सन’ यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेशात  एनडीएला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला  जास्त जागा मिळतील,  असा अंदाज या सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वाधिक ८० लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्यावेळी ७३ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यावेळी केवळ ३३ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर युपीएला गेल्यावेळी इतक्याच म्हणजे २ जागा मिळतील, असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त केला आहे. सपा-बसपा   यावेळी मोठी मुसंडी मारेल, असा  अंदाज आहे. ४५ जागांवर सपा-बसपा आघाडी विजयी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट होईल. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  मात्र,  केंद्रात  पुन्हा मोदी सरकारच स्थापन होईल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून समोर आला आहे.