बसमध्ये चढताना महिलेचे दागिने पळवले

0
425

निगडी, दि. २३ (पीसीबी) – बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायद घेऊन चोरट्याने एक लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना निगडी बस स्टॉप येथे 8 मे रोजी घडली. नीता विजय बनसवडे (वय 39, रा. मिरज, सांगली) यांनी रविवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीता या 8 मे 2022 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास निगडी येथील बस स्टॉपवर बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील एक लाख 40 हजार रुपये किमतीचे 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि त्यांचे आधारकार्ड असा एकूण एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.