राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालयात दाखल

0
662

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे हे देखील ईडी ऑफिस मध्ये दाखल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारीचा म्हणून मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांना ताब्यात घेतले, मनसे पदाधिकाऱ्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.