इडी सीबीआयचा राजकीय वापर बंद करा : आप

0
189

पिंपरी, दि. ३(पीसीबी) – आम आदमी पार्टीच्या वतीने भाजप विरोधात पिंपरीमध्ये जोरदार निदर्शने
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने आज दिनांक 2 जुलै रोजी डीलक्स चौक, पिंपरी येथे भाजप सरकारच्या अघोषित आणीबाणी विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आलेमहाराष्ट्रातील सत्तेच्या सारीपाटावरती गेल्या दहा-बारा दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचा मास्टरमाईंड भाजपाच आहे आणि सत्ता संघर्षाची ही राजकीय सर्कस इ डी सी बी आय सारख्या संविधानिक संघटनांचा दुरुपयोग करून घडवून आणल्या हे आपल्या सर्वांसमोर स्पष्ट झाले आहे.

हे सर्व प्रस्थापित पक्ष चोर चोर मोसेरे भाई या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेतच त्यात सूडबुद्धीने कारवाया करून किंवा पैशाने खरेदी करून सत्तेची गणिते जुळवण्याचे गलिच्छ राजकारण भाजपा संपूर्ण देशामध्ये करत आहे. ईडी च्या कारवाया फक्त विरोधकांना नामोहरम करण्यात आणि भाजपात सामील अथवा समर्थन मिळाले कि क्लीन चिट देण्यासाठीच वापरत आहे. ही स्थिती भारतीय लोकशाही साठी घातक आहे. आज देशामध्ये भाजपच्या या गलिच्छ राजकारणाविरोधात फक्त आम आदमी पार्टीच सक्षमपणे लढा देत आहे. आपच्या मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना दिल्लीमध्ये भाजपने केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला परंतु आम आदमी पार्टी या सर्व पुरून उरली आहे.

भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आता सामान्य जनतेलाच या लढ्यात उतरावे लागणार असल्याचे प्रतिपादन आपचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले स्वप्निल जेवले व यल्लाप्पा वालदोर यांनी या आंदोलनाचे संयोजन केले या आंदोलनाला आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर, शहर संपर्कप्रमुख गोविंद माळी, शहर आयटी प्रमुख आशुतोष शेळके, असंघटित कामगार प्रमुख शुभम यादव, शहर वाहतूक प्रमुख सुखदेव कारले, शहर सामाजिक न्याय आघाडी प्रमुख चंद्रमणी जावळे, चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख संजय मोरे, शशिकांत कांबळे, नितीन कापसे, नंदू नारंग, अजय सिंग, महेश गायकवाड, मीनाताई जावळे, सरफराज मुल्ला, विजय कांबळे, गणेश करडे, सोमनाथ बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.