इंधन दरवाढीवर पंतप्रधान मोदींचे मौन का ? – राहुल गांधी

0
638

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – केंद्रात ‘यूपीए’चे सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून आक्रमक बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मौन का पाळले आहे? पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही पंतप्रधान बोलत नाहीत, ते गप्प का आहेत?, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांना केला आहे. 

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज (सोमवार) भारत बंद पुकारला आहे. यावेळी धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने रामलीला मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद यादव, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.