इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून ‘सीआयएसएफ’च्या जवानांना सायकलिंगचे धडे

0
265

निगडी, दि.०१ (पीसीबी) : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) चौदा जवान पुणे ते दिल्ली १७७५ किमी चा सायकलवरुन प्रवास करणार आहे. हा लांब पल्ल्याचा प्रवास सुलभ होण्यासाठी या १४ जवानांना प्रशिक्षण देण्याचे कार्य निगडीतील इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे( आयएएस) सायकलपट्टू करीत आहे.

हे जवान शनिवारी येरवडा जेल इथून दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहे. सायकल कशी चालवावी याबाबतचे तांत्रिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी, त्याच प्रमाणे विविध भागातील रस्त्यांवरील सरावासाठी आणि लांब पल्ल्याच्या सायकलींचे प्रशिक्षण देण्याचे पत्र पुण्यामधील इंडो ॲथलेटिक्स सोसायटी ला प्राप्त झाले. आयएएसचे संस्थापक सदस्य गजानन खैरे, गणेश भुजबळ,अजित पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली.

यासाठी आयएएसतर्फे पाच दिवसाचा प्रशिक्षण आराखडा तयार केला होता.
पहिल्या दिवशी रावेत ते कासारसाई डॅम ( ५० किमी – कच्च्या रस्त्या वरील सराव,
दुसरा दिवस : रावेत ते एन डी ए गेट चांदणी चौक ( ६० किमी – हायवे रोड वरील सराव )
तिसरा दिवस : रावेत ते सारसबाग ( ५० किमी – शहरी भागातील रोड वरील सराव )
चौथा दिवस : रावेत ते भंडारा डोंगर ( ४० किमी – घाट रोड वरील सराव )
पाचवा दिवस : रावेत ते लोणावळा ( १०० किमी – लांब पल्ल्याचे अंतराचा सराव करून घेतला.

सर्व सीआयएसएफचे जवान पहाटे साडेपाच वाजता रावेत पुलावर एकत्र येतात आणि तेथून ती इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यांसोबत सरावासाठी निघतात. शहरातील विविध ठिकाणी आय ए एस चे सदस्य त्यांना भेटतात त्यांच्या मोहिमेविषयी जाणून घेतात आणि त्यांच्या सोबत काही अंतर ते देखील सायकलिंग करतात. विशेष म्हणजे सर्व प्रशिक्षण त्यांना मोफत देण्यात येत असल्याची माहिती इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

पुणे- दिल्ली या सायकल मोहिमेत पी आर जाधव,राहुल पवार, धीरज जांगिर, बाबर श्रीराम, विकास कुमार,विनीत एसी, मुकेश कुमार, प्रशांत सांगवे,एस के परीडा, आनंत कुमार,चंदन पांडे,नरेंद्र कुमार, फदेनंद्र कुमार, विकास कुमार या जवानांचा समावेश आहे.

विविध ठिकाणांचे दर्शन झाले. प्रवासाचे अनुभव आम्हाला मोहिमेमध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहे, सर्व भारतातील सीआयएसएफ जवान एकत्र असून आणि मोहिमेला योग्य पद्धतीने सराव करून घेतल्यामुळे आम्ही प्रशिक्षक यांचे खूप आभारी आहोत असे प्रतिपादन सीआयएसएफ चे उपनिरिक्षक प्रदीप यादव यांनी केले.
शारीरिक क्षमता जरी जास्त असली तरी तांत्रिक दृष्ट्या सायकलिंग करण्याचे बऱ्याच सदस्यांना माहीत नव्हते काही सदस्यांनी गिअरच्या सायकली चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना प्रशिक्षणाची खूप गरज होती. त्यासाठी आम्ही आयएएस ही योग्य संस्था निवडल्याचे मत निरीक्षक उत्तरा पणवर यांनी व्यक्त केले.