आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा संसर्ग; चायनाच्या सीमा लगत भागात पहिल्यांदा अढळला – अतुल बोरा (पशुसंवर्धन मंत्री, आसाम)

0
461

प्रतिनिधी,दि.४ (पीसीबी) : कोरोना वायर्सचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा सामना करत असतानाच आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा (एएसएफ) संसर्ग आढळला आहे. चायना मधील जिंगझियांग परिसरात प्रथम आफ्रिकन स्वाईन फ्लूचा प्रसार आढळून आला, हा भाग चायना – अरुणाचलप्रदेश सीमा लगत आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यातील डुक्करांना एएसएफ या वायरसचा संसर्ग होत असल्याने आसाममध्ये डुक्करांच्या खरेदी – विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

आसाम राज्याचे पशुसंवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आसाम मध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळला असल्याची माहिती दिली. आसामच्या सहा जिल्ह्यांमध्ये अचानकपणे २,००० पेक्षा जास्त डुक्कर मृत्युमुखी पडल्या नंतर हि बाब समोर आली, असे बोरा यांनी सांगितले. भोपाळ स्थित नॅश्नल इंस्टिट्यूट ऑफ़ हाय सिक्युरिटी एाॅनिमल डीसीसेस (NIHSAD) येथे आसाम व अरुणाचलप्रदेश मधील डुक्करांचे टिश्यू सॅमपल्स तपासणीसाठी पाठविण्यात आले. NIHSAD ने केलेल्या रिपोर्टनुसार ते टिश्यू समपल्स एएसएफ (ASF) वायरस पॉझिटिव असल्याचे दिसून आले. बोरा यांनी पुढे सांगितले कि, डुक्कराचे मांस खाणाऱ्या लोकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. केंद्र शासनाने डुक्करांचे कल्लींग (उचलून नेणे) करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु संघटीत व असंघटीतपणे डुक्करांचे पालन केले जाते व एकट्या आसाममध्ये त्याची संख्या २० लाख पेक्षा जास्त आहे. त्यामुळे डुक्करांचे कल्लीॅग करणे अवघड असल्याचे पशुसंवर्धन मंत्री बोरा यांनी सांगितले.

आसाम मधील धेमाजी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे सुमारे २५० डुक्कर मृत्युमुखी पडले असून त्यांचा सांभाळ करणाऱ्या कामगाराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या कामगाराचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. डुक्करापासून मनुष्याला आफ्रिकन स्वाईन फ्लू वायरसचा संसर्ग होऊ शकतो का ? या शक्यतेची पडताळणी केली जात आहे. तसेच डुक्करांचे पालन पोषण करणारे शेतकरी व कामगारांच्या आरोग्याचे माॅनिटरिंग केले जात आहे. यापूर्वी भारतात क्लासिक स्वाईन फ्लू वायरसचा (CSF) प्रसार झाला होता व त्यावर लस देखील तयार करण्यात आली होती. परंतु आफ्रिकन स्वाईन फ्लू वायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.