आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे एएन -३२ विमान बेपत्ता

0
406

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाचे एएन -३२ हे विमान आज (सोमवार) दुपारी बेपत्ता झाले. या विमानाने दुपारी १२.२५ मिनिटांनी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून अरुणाचल प्रदेशमधील अॅडवांस लँडिंग ग्राउंड मेचुकासाठी उड्डाण घेतले होते. दुपारी १ च्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला.

या विमानात आठ ८ कर्मचारी आणि ५ प्रवासी असल्याचे समजते.  दरम्यान, हवाई दलाने सुखोई-३० आणि सी-१३० स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत. सैन्यदलाला आणि आयटीबीपीलाही शोध मोहिमेसाठी रवाना  करण्यात आले आहे. मेचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम सिआंग जिल्ह्यातील मेचुका व्हॅलीमध्ये आहे. मॅकमोहन रेषेवळील भारत-चीन सीमेवरील हे सर्वात जवळचे लँडिंग ग्राउंड आहे.

दरम्यान,  हवाई दलाचे हे विमान दुपारी १.३० वाजता मेचुका येथे पोहोचणार होते. परंतु ते ठरलेल्या वेळेत ते या ठिकाणी पोहोचले नाही. आम्ही सध्या शोधमोहिम सुरू केली आहे, अशी माहिती हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर रत्नाकर सिंग यांनी  दिली.