आश्चर्य: महिला काँन्स्टेबलने केले गँगस्टरशी लग्न

0
608

लखनऊ, दि. ९ (पीसीबी) – तुम्ही अनेक चित्रपटामध्ये गँगस्टर आणि महिला पोलिसाचे प्रेम फुलताना पाहिले असेल. मात्र खऱ्या अयुशात लखनऊच्या तुरूंगात अशीच एक घटना घडल्याचे पहायला मिळाले आहे.

एका महिला कॉन्स्टेबलने गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टर राहुल ठसराना सोबत विवाह केला आहे. या दोघांनी कोणाचीही पर्वा न करता विवाहसोहळा रचला. गँगस्टर राहुलवर डझनभर गुन्हेगारी खटल्यांची नोंद आहे. २०१४ मधील बहुचर्चित मनमोहन गोयल हत्याकांडात दोषी आढळ्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल ठसरानाने २००८ च्या दरम्यान गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकले. त्याआधी तो सिकंदराबादमध्ये रिक्षा चालकाचे काम करत होता.

कसे जुळले सुत?

जेव्हा राहुल कारागृहात कैद होता तेव्हा महिला पोलीस कर्मचारी आपल कर्तव्य बजावत होती. यावेळी दोघांमध्ये संवाद सुरू झाला. यामधून त्यांची मन जुळली. कारागृह परिसरात लपून छपून भेटी वाढल्या. काही काळानंतर राहुलची जामिनावर सुटकाझाल्यानंतर दोघांनी लग्न केले.