आरोपीची पत्नी म्हणाली, ‘तिथेच मलाही मारा’

0
754

हैदराबाद, दि.७ (पीसीबी) – माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल, तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी असे आरिफ याच्या वडिलांनी म्हटले होते. आरोपी चेन्नाकेशावुलू याची पत्नी रेणुका हिने दु:ख व्यक्त केले. आता माझ्याकडे जगण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे मला माझ्या पतीला जिथे मारले तिथेच नेऊन मारा अशी प्रतिक्रिया तिने दिलीय. माझ्या पतीला काही होणार नाही, आणि तो लवकरच घरी परत येईल असे मला सांगण्यात आल्याचेही ती म्हणाली. काय करायचे हे मला काहीच माहीत नाही. कृपा करून मला तिथे घेऊन चला जिथे माझ्या पतीला मारले आणि मलाही तिथेच मारा असे रेणुका पुन्हा पुन्हा म्हणत होती. चेन्नाकेशावुलू आणि रेणुकाचे नुकतेच लग्न झाले होते.