“आम्हाला ८० टक्के मते मिळतील”- नारायण राणे

0
373

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – निवडणुकीत वातावरण पोषक असून निवडणूक एकतर्फी होत असल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. आमची आणि भाजपाची मते एकत्र आल्यास ७० टक्केच्या जवळपास पोहोचत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यावर्षी भाजपातर्फे नितेश राणे निवडणुकीला उभा आहे. या निवडणुकीत त्याच्या मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही मतदारसंघात वातावरण आम्हाला, नितेश राणेसाठी पोषक आहे. आम्हाला ८० टक्के मतदान पडेल. त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी होईल असा विश्वास वाटतो”.

पुढे बोलताना, “आमची मते आणि भाजपाची मते एकत्र आल्यास आम्ही ७० टक्केच्या जवळपास पोहोचत आहोत. त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी होईल असे सांगत आहोत”. सिंधुदुर्गातील आमचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.