अल्पवयीन मुलाशी संबंध ठेऊन ३३ वर्षीय महिलेने दिला बाळाला जन्म

0
942

फ्लोरिडा, दि.२१ (पीसीबी) – फ्लोरिडातील हिल्सबोरोमध्ये एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका ३३ वर्षीय महिलेला २०१४ मधील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या महिलेने एका ११ वर्षाच्या मुलावर तब्बल १५ वेळा बलात्कार केल्याचा आरोप होता. जो तिने नंतर मान्य देखील केला. एवढेच नव्हे तर या महिलेने फ्लोरिडातील हिल्सबोरो काउंटीमध्ये एका मुलाला देखील जन्म दिला होता. या आरोपी महिलेचे नाव मारिसा मॉरी असे आहे. महिलेने ज्या मुलावर बलात्कार केला होता. त्या पीडित मुलाचे आजमीतिला वय १७ वर्ष आहे. पण आता तो आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचे पालन पोषण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

ज्यावेळी मारिसाने ११ वर्षाच्या मुलावर वारंवार बलात्कार केला होता. त्यावेळी तिचं वय हे २८ वर्ष होते. खरे तर ती ११ वर्षाच्या मुलासाठी नॅनीचे काम करत होती. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा कबूल केल्यानंतर आणि त्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर मारिसाला कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली. रिपोर्ट्नुसार, मारिसाने याआधी देखील एका अल्पवयीन मुलाशी संबंध ठेऊन दुसऱ्या एका मुलाला जन्म दिला होता.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जानेवारी २०१४ मध्ये जेव्हा महिलेने ११ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तेव्हा ती नॅनीचं काम करत होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये मारिसाने एका मुलाला जन्म दिला. पण त्यावेळी ११ वर्षाच्या पीडित मुलाच्या पालकांना ही गोष्ट माहित नव्हती की, मारिसाने नेमकं काय केलंय. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांचं असं मत होतं की, मारिसाला तिच्या एखाद्या प्रियकरापासून मुलगा झाला आहे.

दरम्यान, पीडित मुलाच्या आईने या प्रकरणाबाबत बोलताना असे म्हटले की, ‘या महिलेच्या वासनांध कृत्यामुळे माझ्या मुलाला त्याचे बालपण गमवावे लागले आहे. तो एखाद्या सामन्या टीन एजर प्रमाणे आपले आयुष्य व्यतीत करु शकला नाही. लहानपणातच एक बाप म्हणून त्याला जगावे लागले.’ मारिसने मुलाला जन्म दिल्यानंतर त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी ही पीडित मुलावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर टाकण्यात आली.