‘आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?’

0
280

सिंधुदुर्ग, दि.३० (पीसीबी) : राज्यातील महापुरानंतर आता मदतीवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 701 कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. मात्र, सध्यस्थितीतील महापुरामुळे झालेल्या नुकसानाबाबत अद्याप पॅकेज जाहीर करण्यात आलेलं नाही. यावरुन काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर टीका केलीय. वडेट्टीवार यांच्या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय.

‘पंतप्रधान मोदी यांनी राणे साहेबांना पाहणी करण्याची परवानगी दिली आणि त्या पद्धतीने राणे साहेब आले.आणि राणे साहेबांनी,देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जी माहिती दिली त्या आधारे तातडीची 700 कोटींची मदत पाठवली आहे. आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले हें सुद्धा वडेट्टीवारांनी सांगाव. स्वतःच ठेवायचं झाकून आणीं दुसऱ्याच पहायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं’, अशी टीका नितेश राणे यांनी वडेट्टीवारांवर केलीय.

सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिस ते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी टीका नितेश राणेंनी केली. ते सिंधुदुर्गात बोलत होते.