“आमच्या नेत्यावर टीका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या”

0
179

मुंबई,दि.२५(पीसीबी) – ज्या नव्या योजना तयार केल्या, मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आणल्या. निवडणुका आल्यानंतर केंद्र सरकार अडचणीत आली की, हे पैसे खात्यात टाकायला सुरुवात केली जाते. हा त्यांचा प्रोपोगंडा आहे, अस घणाघातही मलिकांनी केलीय. जर योजना होती, तर योजना का थांबवली, योजना का थांबवता, पैसे का थांबवता, शेतकरी देशात पेटला तर खात्यात दोन कोटी टाकून देशात वेगळं वातावरण तयार करत आहेत, लाखो शेतकऱ्यांना नोटीस पाठवून दिलेले पैसे परत मागितले जात आहेत. पात्रतेचं कारण देत दिशाभूल करत आहेत. भाजप शेतकऱ्यांना घाबरलं जातंय, हजारो कोटी शेतकऱ्यांची दिशाभूल करायला खर्च करत आहेत. मग कायदा मागे घ्या, खर्च का करता?, असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उपस्थित केलाय. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

माझ्या मर्जीने देश चालेल हे लोकशाहीला मारक आहे. भाजपवाल्यांना दुसरा जिल्हा मिळत नाही, एक विरोधी पक्षनेता आणि दुसरा प्रदेशाध्यक्ष, नागपूरला मेळावा घेता येत नाही. नागपूर हरल्यानंतर आता विश्वास राहिला नसेल की इथे कार्यक्रम होणार नाही. हा कायदा मागे घेणं ही काळाची गरज नाही. मोदींचा स्वभाव आणि कार्यपद्धती ही लोकशाहीला मारक आहे, असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. तसेच राष्ट्रवादीच्या इनकमिंगवरही त्यांनी भाष्य केलंय. बरेच विद्यमान आमदार हे राष्ट्रावादीत येणार आहेत, मेगा भरती होणार आहे, असंही नवाब मलिकांनी अधोरेखित केलंय.

दरम्यान आमच्या नेत्यावर टीका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या. स्वतः विश्वासघातकी भूमिका घेता आणि कुठल्या तोंडाने आमच्यावर टीका करत आहात, असा पटलवारही त्यांनी भाजपवर केलाय. मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे. यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टीका करत आहेत, असंही म्हणत त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.