अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेंग्यूची लागण, चित्रपटाचे शुटिंग रद्द  

0
753

मुंबई, दि.४ (पीसीबी) – ‘स्त्री’ सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर टेनिस स्टार सायना नेहवालवरील आधारित सिनेमात काम करत आहे. या चित्रपटाबद्दल तिच्या चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली असून हा सिनेमा लवकर प्रदर्शित होण्याची ते वाटही पाहत आहेत. मात्र श्रद्धाला डेंग्यू झाल्याने सध्या तरी तिने सर्व शुटिंग रद्द केले आहे. त्यामुळे हा सिनेमा लटकण्याची चिन्हे आहेत. 

श्रद्धा कपूर तब्येत खराब असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सांगत होती. तब्येत अधिकच खालावल्याने तिने २७ सप्टेंबर रोजी शुटिंग रद्द केले आणि रक्त चाचण्या करून घेतल्या. त्यात तिला डेंग्यू झाल्याचे आढळून आले. डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्यावर तिने तात्काळ सर्व चित्रीकरण बंद केले असून घरी आराम करणे सुरू केले आहे. त्यामुळे सायनावरील चित्रपटाचे सुरू झालेले चित्रीकरण अवघ्या आठ दिवसांतच बंद करण्यात आले आहे. मात्र श्रद्धा लवकरच सेटवर परत येईल असे सांगितले जात आहे.