आनंदनगर झोपडपट्टीत टोळक्याचा हैदोस; नागरिकांना धमकावून फोडली वाहने

0
268

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – एका टोळक्याने चिंचवड मधील आनंदनगर येथे हैदोस घालून दहशत पसरवली. तसेच वाहनांची तोडफोड करून नागरिकांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री साडेसात वाजता घडली. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमोल रमेश ढगे (वय 31, रा. जगताप नगर, थेरगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उमाकांत वाघमारे, सागर डावरे, अभिषेक गायकवाड, हृतिक जाधव व इतर मुले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी ढगे हाऊस किपींगच्या कामासाठी आनंदनगर येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी हातात कु-हाड, कोयते, काठ्या घेऊन आले. त्यांनी दहशत पसरवून फिर्यादी यांच्या टेम्पोच्या काचा फोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या खिशातून एक हजार 120 रुपये जबरदस्तीने काढून चोरून नेले.
किशोर महादेव कसबे (वय 28, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी देखील चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण डोंगरे, अभिषेक गायकवाड, स्वप्नील गाडे आणि इतर मुले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी कसबे भाजी विक्रीचे काम करतात. ते मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता आरोपी कु-हाड, कोयते, काठ्या घेऊन आले. त्यांनी दहशत पसरवून फिर्यादी यांच्या टेम्पोच्या काचा फोडून आठ हजारांचे नुकसान केले. टेम्पोच्या चालकाकडून जबरदस्तीने 850 रुपये जबरदस्तीने घेऊन चोरून नेले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.