आधी राजकारणासाठी आता पैशांसाठी महाराजांचा वापर – अजित पवार

0
436

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यावर राष्ट्रवादी चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

ज्या गडकिल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर उभा राहतो, त्याचा अशा प्रकारे वापर करून पैसे कमावण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. आधी राजकारणासाठी तर आत्ता पैसे कमवण्यासाठी महाराजांचा वापर करणाऱ्या या सरकारचा मी ठामपणे विरोध करतो, असे ट्विट अजित पवारांनी केले आहे.

ज्या गडकिल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर उभा राहतो, त्याचा अशा प्रकारे वापर करून पैसे कमावण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. आधी राजकारणासाठी तर आत्ता पैसे कमवण्यासाठी महाराजांचा वापर करणाऱ्या या सरकारचा मी ठामपणे विरोध करतो, असे देखील अजित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान या निर्णयाचा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.