आता एसटी बस एलएनजीवर धावणार – दिवाकर रावते   

0
1011

पंढरपूर, दि. ३ (पीसीबी) – डिझेलच्या वाढत्या खर्चाला फाटा देण्यासाठी एसटी  बस आता  एलएनजी वर  चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महामंडळाला १ हजार कोटी रुपयाचा फायदा होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी  दिली .

पंढरपूर येथे  भक्त निवास व नवीन स्थानकाचे भूमीपूजन रावते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावते बोलत होते .

रावते म्हणाले की,  एसटी बसेस   एलएनजी वर  चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी  राज्यातील १८ हजार बसेस मध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत.  एसटी  आपले पंप बाहेर बसवणार  आहे. यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत एलएनजी  टाकता येणार  आहे. एलएनजीवर बस चालवणारा महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असे रावते यांनी सांगितले.