दिघीत मासे विक्रेत्याने पोत्यात ठेवलेली ५३ हजारांची रोख चोरट्यांनी केली लंपास

0
456

दिघी, दि. ३ (पीसीबी) – दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत बेडरूममध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवलेली ५३ हजारांची रोख चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास दिघी येथे घडली.

याप्रकरणी प्रशांत बबन राऊत (वय ३७, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, चौधरी पार्क, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त ते शुक्रवारी रात्री बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची दोन मुले घरी होती. रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान दरवाजाला कडी लावून मुले दळणाकरिता बाहेर गेली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवलेले ५३ हजार रुपये चोरुन नेले. प्रशांत यांची मुले घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.