आता आधार क्रमांक देण्याची गरज नाही; व्हीआयडी सुविधा सुरू

0
742

आधार प्राधिकरणाने आधार कार्डशी संबंधित व्हर्च्युल आयडीची (व्हीआयडी) सुविधा सुरु केली आहे. नागरिकांचा एक व्हिआयडी तयार केला जाईल. त्यामुळे ज्या ठिकाणी आधार क्रमांक द्यावा लागत होता. आता त्याठिकाणी केवळ हा व्हिआयडी दिला तरी चालणार आहे. यामुळे नागरिकांना वारंवार आपला आधार क्रमांक देण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. हा व्हिआयडी आधार क्रमांकासाठी प्राथमिक स्वरुपात एक पर्याय असेल, असे आधार प्राधिकारणाने म्हटले आहे.  

नागरिकाला व्हीआयडी स्वत: तयार  करता येऊ शकतो. हा १६ अंकांचा आयडी असेल. त्याची  केवळ एका दिवसासाठी वैधता असेल. त्यानंतर दुसऱ्या कामासाठी पुन्हा असा आयडी तयार  करता येऊ शकतो. मात्र, दुसरी कोणतीही व्यक्ती युझर्सच्या आधार क्रमांकासाठी व्हीआयडी तयार करु शकणार नाही. केवळ तो युझर्सच तयार करु शकतो. या आयडीसाठी युजर्सच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल.

आधार प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जाऊन हा व्हिआयडी तयार केला जाऊ शकतो. यासाठी वेबसाईटवर नागरिकाला आपल्याला आधार क्रमांक आणि सुरक्षा प्रश्न निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिकाच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर व्हीआयडी तयार करण्यासाठी एक पर्याय दिला जाईल. त्यावर क्लिक केल्यास लगेच तुमच्या मोबाईलवर व्हिआयडी मिळेल. अशा पध्दतीने केव्हाही असा व्हिआयडी तयार केला जाऊ शकतो.

या आयडीचा वापर आधारच्या माहितीतील पत्ता ऑनलाइन अपडेट करण्यासाठी होऊ शकतो. तसेच आधार क्रमांकाची आवश्यकता असणाऱ्या कंपन्या व्हिआयडीचा स्वीकार करतील. तसेच आधार क्रमांकाच्या सुरक्षेसासाठी हा नवा पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी व्हिआयडी तयार करावेत, असे आवाहन आधार प्राधिकरणाने केले आहे.