“…आणि पिंडाला (श्राद्धाच्या जेवणाला) कावळा शिवला”

0
199

– सर्वपित्री अमावस्येला डॉ. संदीप बाहेती यांचा एक आदर्श उपक्रम

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – सर्वपित्री अमावस्येला आपल्या दिवंगत पूर्वजांना आठवून कावळ्याला नैवेद्य ठेवून पितरांच्या मुक्तीसाठी त्यांच्या नावाने जेवणावळी घालण्याची प्रथा वर्षोनवर्षे हिंदू धर्मात अखंडपणे सुरू आहे. आजच्या या सर्वपित्री अमावस्येला प्रसिध्दी भूलतज्ञ, पर्यावरण स्नेही डॉ. संदीप बाहेती यांनी एक आगळा वेगळा उपक्रम करून समाजाला आदर्श घालून दिला. एका मुस्लिम फकिराला घरी निमंत्रीत करून त्यालाच सन्माने बसवून महाप्रसाद व दक्षिणा दिली आणि लोटांगन घालून पूर्वजांना आवाहान केले. डॉ. बाहेती यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल डॉ. बाहेती म्हणाले,
आज सर्व पित्री आमवश्या आहे. पूर्वजांना आठवण करण्याचा आणि काही चुकले असल्यास क्षमा मागण्याचा दिवस आहे. आपण आपला देश हाच जर कुटुंब मानले तर सर्व हुतात्मा स्वतंत्र सैनिक आपले पूर्वज आहेत. मग त्या हुतात्म्यांमधे सर्व जाती धर्माचे लोक येतात. आज मी देश कुटुंब मानून एका उदात्त हेतुने सर्व हुतात्म्यांचे सुद्धा श्राद्ध घातले.”

दरर्षी मी सर्वपित्री अमावस्येला स्वतःची गाडी काढतो आणि रस्त्यावर कुणी गरजू अथवा कुणी भुकेला भेटल्यावर त्यास घरी अतिथी म्हणून जेवण्यास घेवून येतो. आज लवकर कुणी दिसेना. बराच शोध घेतल्यानंतर एक मुस्लिम फकीर मला दिसले. मी त्यांना जरा चाचपडत विचारले, “श्राद्धाचे जेवणार का ?“ फकीर तत्काळ `हो` म्हणाले. मी त्यांना घरी आणले, बस्कर टाकून भोजनाचे ताट दिले. प्रथेप्रमाणे नमस्कार केला. इकडे त्या फकीर व्यक्तीने घास घेतला आणि तिकडे पिंड येवं श्राद्धाच्या जेवणाला कावळा शिवला हो ! आज मुस्लिम फकीर अतिथी म्हणून भेटणे आणि त्यांनी घास घेतल्यावर कावळ्याने घास घेणे हा माझ्यासाठी मोठा योगायोग नक्कीच नव्हता !“