आणखी ‘एका’ रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळे 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू

0
241

मुरादाबाद, दि.२९ (पीसीबी) : मुरादाबादमधील मजोला पोलीस स्टेशन परिसरातील ब्राइट स्टार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ही माहिती मिळताच रुग्णालयातील प्रशासनाने ऑक्सिजन पुरविला नाही, असा आरोप करत रुग्णांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या गेटवर जाऊन गदारोळ सुरू केला. माहिती मिळताच जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कुटुंबाचा आरोप आहे की आतापर्यंत 17 कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत रुग्णालय प्रशासन व पोलिस प्रशासन अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

रुग्णालयातील रूममध्ये हॉस्पिटल प्रशासन, पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. ब्राइट स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी.पी. सिंह म्हणतात की, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन उपलब्ध आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक होती अशा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.