आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत

0
376

नागपूर, दि.२८ (पीसीबी) – नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केले आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे. श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे,” असे सागत नितीन गडकरी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले,”आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी हे अप्रत्यक्षरित्या तुटलेल्या युतीवरून आणि सत्तेतून बाहेर जाव्या लागलेल्या भाजपाला,” टोला लगावला.

दुसऱ्या टप्प्यातील नागपूर मेट्रोचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंकद्वारे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण होण्यापूर्वी केंद्रीय नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी गडकरी यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयांचे कौतूक केले. त्याचबरोबर सध्याच्या सरकारने विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत, अस आवाहनही केले.