आजपासून राज्याच्या सिमेवर ‘हे’ आहेत निर्बंध

0
353

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी सुरु होणार आहे.

कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.

देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.
विशेषत: दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांतून प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात सशर्त प्रवेश देण्यात येणार आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय.