“आजपासून कोल्हापूरमधून मुंबई, पुण्याला होणारा दुध पुरवठा बंद. कारण कि….”

0
296

कोल्हापूर,दि.१७(पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगितीदिल्याने त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आणि याचा फाटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे आज सकाळी नऊपासून कोल्हापूरमधूम मुंबई आणि पुण्याला दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्याच्या परिस्थिती मराठा समाज आक्रमक झाला आहे कारण कि, मराठा आरक्षण प्रश्नी पुढील निर्णय होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. 23 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. 50 हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयातील कायेदशीर लढा जिंकण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.