आचारसंहिता लागू, वर्क ऑर्डरला बूच

0
281

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिसाठी अनपेक्षितपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. गेले वर्षभर प्रशासकीय राजवट असल्याने नेहमी प्रमाणे पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचा प्रश्न आला नाही, मात्र मोठ मोठ्या वर्क ऑर्डरला बूच लागले आहे. त्यातच महापालिका आयुक्त विदेश दौऱ्यावर तर अतिरिक्त आयुक्त मुंबईला गेल्याने आता निवडणूक निकाल लागेपर्यंत किमान पुढचे दीड महिना नवीन कामाचे आदेश देता येणार नाहीत.

शहरातील अनेक महत्वाच्या कोट्यवधी रुपयेंच्या प्रकल्पांचे आदेश रख़णार आहेत. प्रामुख्याने सुमारे ३० कोटी रुपयेंच्या भामा आसखेड जॅकवेल प्रकऱणाचे कामाचा आदेश देता येणार नाही. महापालिकेने बांधलेल्या अनेक कामांचे उद्घाटन, भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते, आता त्यालाही खो बसला आहे.