आकुर्डीत भाजप नगरसेविकेच्या मुलाच्या दुकानात चोरी

0
611

निगडी, दि. ३ (पीसीबी) – भाजपचे माजी नगरसेवक भिमा बोबडे आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी बोबडे यांच्या मुलाच्या दुकानातील मोबाईल आणि एलसीडीटीव्ही असा एकूण ४५ हजार ६०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना १८ मार्च ते १९ मार्च दरम्यान आकुर्डीतील डायमंड फोम या दुकानात घडली.

याप्रकरणी अक्षय भिमा बोबडे (वय २३, रा. सखा बंगलो, सेक्टर नं. २१, प्लॉट नं.८७, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा भाजपचे माजी नगरसेवक भिमा बोबडे आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी बोबडे यांचा मुलगा आहे. त्यांचे आकुर्डी येथे डायमंड फोम नावाचे दुकान आहे. १८ मार्च ते १९ मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शेटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील अॅपल कंपनीचा मोबाईल आणि एलसीडी टीव्ही असा एकूण ४५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरु नेला. अक्षय हा बाहेर गावी गेला असल्याने त्याने मंगळवारी (दि.२) रोजी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घाडगे तपास करत आहेत.